Nisarga Raja Aik Sangate / निसर्गराजा ऐक सांगते
मेघांनो, वृक्षांनो, वेलींनो, कळ्यांनो, फुलांनो
तेरी भी चूप, मेरी भी चूप
कुणाला काही सांगू नका, कबूल?
निसर्गराजा ऐक सांगते गुपित जपलं रे
कुणी माझ्या मनात लपलंय् रे
तो दिसला अन् मी पाहिले
पाहिले परि ते कुर्र्याने
डोळ्यांत इशारे हसले
हसले ते मोठ्या तोर्याने
हे कसे न त्याला कळले?
कळले न तुझ्या त्या ओठाने
ओठ न हलले शब्द न जुळले, थोडे चुकले रे
का चाललात?
तुम्ही आलात म्हणून.
जरा थांबा ना !
का?
वा छान दिसतंय् !
काय?
हे रूप भिजलेलं
आणि ते पहा-
काय?
अन् तुमचं मनही भिजलेलं
कशानं?
प्रेमानं प्रेमानं प्रेमानं
तो भाव प्रीतीचा दिसला
दिसला, मग संशय कसला?
हा नखरा का मग असला?
असला हा अल्लड चाळा !
प्रेमात बहाणा कसला?
कसला तो प्रियकर भोळा !
प्रीत अशी तर रीत अशी का, कोडे पडलंय् रे !
गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: राम कदम
स्वर: चंद्रशेखर गाडगीळ, उषा मंगेशकर
चित्रपट:झुंज
गीत प्रकार: युगुलगीत, चित्रगीत