Everest Marathi Marathi Songs Music बेला शेंडे स्वप्नील बांदोडकर

Olya Sanjveli Lyrics Marathi || ओल्या सांजवेळी मराठी लिरिक्स

Olya Sanjveli / ओल्या सांजवेळी 

ओल्या सांजवेळी…
उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना

आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके
सुख हे नवे सलगी करे, का सांग ना
सारे जुने दुवे, जळती जसे दिवे
पाण्यावरी जरा सोडून देऊया

माझी ही आर्जवे, पसरून काजवे
जातील या नव्या वाटेवरी तुझ्या
रस्ता नवा शोधू जरा, हातात हात दे
पुसुया जुन्या पाउल खुणा

सोबत तुझी साथ दे
वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे
डोळ्यातल्या सरी विसरून ये घरी

ओळख आता खरी होऊन जाऊ दे
सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला

गीत : ओल्या सांजवेळी
गीतकार : अश्विनी शेंडे.
गायक : स्वप्नील बांदोडकर , बेला शेंडे
संगीत लेबल: Everest Marathi

You may also like

Marathi Songs Music Zee Music Company मराठी गाणी

Datale Reshami Marathi Lyrics || दाटले रेशमी

Datale Reshami Aahe Dhuke Dhuke / दाटले रेशमी आहे धुके धुके मौला इश्क है खुदा दुहाई देती है जुबान दाटले
Marathi Songs Music Zee Music Company अजय गोगावले मराठी गाणी

Koral Naav Marathi Lyrics || कोरलं नाव मराठी लिरिक्स

Koral Naav / कोरलं नाव कोरलं नाव मी श्वासवरी पेरलं काटं तू पायी जरी कोरलं नाव मी श्वासवरी पेरलं काटं