Payavari Priyachya Sarvasva / पायावरी प्रियाच्या सर्वस्व
काया जरी निमाली का प्रीत ओसरेल?
छायेपरी सदा ती मागे तुझ्या फिरेल
पायावरी प्रियाच्या सर्वस्व वाहणारी
मी एक प्रेमवेडी प्रीतीच पाहणारी !
प्रीतीसवे हसावे प्रीतीसवे रुसावे
प्रीतीशिवाय काही डोळ्यांस ना दिसावे
त्या धुंद भावनेच्या स्वप्नात राहणारी
मी एक प्रेमवेडी प्रीतीच पाहणारी !
दोघांमधील आहे प्रीती युगायुगांची
वेडावल्या जिवाला पर्वा नसे जगाची
ज्योतीवरी पतंग पंखांस दाहणारी
मी एक प्रेमवेडी प्रीतीच पाहणारी !
गीत: शान्ता शेळके
संगीत: एम्. शफी
स्वर: लता मंगेशकर
चित्रपट: श्रीमंत मेहुणा पाहिजे
गीत प्रकार: चित्रगीत