ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुधीर फडके

Phulav Pisara Mora Marathi Lyrics | फुलव पिसारा मोरा

Phulav Pisara Mora / फुलव पिसारा मोरा

फुलव पिसारा मोरा श्रावण येतो आहे !
उंच स्वराने वारा स्वागत गातो आहे !

तू धरणीचा मानसभाव
सहजनृत्य हा तुझा स्वभाव
आजवरीच्या उच्छवासांचा सौरभ होतो आहे !

थेंब कशाचे जलवर्षाव
तृप्तीमाजी बुडेल गाव
वसुंधरेचा प्रियकर वेगे दौडत येतो आहे !

लवते वेली हलते झाड
विजया आधी धुंद कवाड
संघनृत्यी या उडते माती गुलाल होतो आहे !

 

गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत:  सुधीर फडके
स्वर: लता मंगेशकर
चित्रपट: माझं घर माझी माणसं
गीत प्रकार: चित्रगीत

You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते