Pori Tujhe Nadan / पोरी तुझे नादान
कान्हा…
तोरी राधा बावरी
पोरी सांगतय तुला खरं खरं
तुझ्याविना मला करमत नाय
तुझ्यासाठी मी रानी झालो दिवाना
तुझ्याशी लगीन कराचं हाय
पोरी तुझे नादान झयलो दिवाना
बांधलाय येशीवं बंगला ह्यो
पोरी तुझे अदावर झयलो फिदा मी
तुझ्यात जीव माझा रंगला गो
पोरी तुझे नादान झयलो दिवाना
बांधलाय येशीवं बंगला ह्यो
पोरी तुझे अदावर झयलो फिदा मी
तुझ्यात जीव माझा रंगला गो…
नाय मला गरज तुझ्या या पिरमाची
मी तुझ्या प्रेमाला भुलायची नाय
कनाला करतस दैना तु जिवाची
डोर आपले दोघांची जुलायची नाय
हे…लाडाची लेक मी हाय कोलीवाड्याची
तुझ्या मी जाल्याला घावाची नाय
लाडाची लेक मी हाय कोलीवाड्याची
तुझ्या मी जाल्याला घावाची नाय
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या…
थांब थांब थांब पोरी चाललीस कया बेगीन
पोरांच्या जीवाला लावुनशी घोर
होठावं लाली हाय डोल्यान सुरमा
तु दिसतस जनु चंद्राची कोर
Insta वर Follow केला Photo तुझा Like केला
Whatsapp वर Sad Status ठेवतय बघ ह्यो,
भाव तु खातस जाम Reply पन देत नाहीस
नाखवाला लागला तुझ्या प्रेमाचा रोग
लटक मटक चाल तुझी कालजावं घाव करी
तुझ्याविना नाखवा ह्यो राहील कसा
लेक हाय तु नाखवाची धडधड तु कालजाची
तुझा नादान झालाय ह्यो येरा पिसा
लटक मटक चाल तुझी कालजावं घाव करी
तुझ्याविना नाखवा ह्यो राहील कसा
लेक हाय तु नाखवाची धडधड तु कालजाची
तुझा नादान झालाय ह्यो येरा पिसा…
माझ्या ह्रदयाची काय सांगु दशा तुला
माझे मनान काय घडतय
तुला बघुनशी रानी दिवाना झयलो
कालीज धडधडतय
तुझ्या रुपाची चढली नशा मला
माझं मन तुझ्या मागं पलतय
रोज रोज पोरी बंदरावरी मी
तुझीच वाट बघतय
मना दौलत नको तुझी शोहरत नको
मना पोरा तुझी रं साथ हवी
सात जन्माची देईल साथ तुला
आधी लगीन कर तु माझ्याशी
माझा कालीज आज बघ भिडला
राजा तुझ्याच कालजाशी
बेगीन वाजत गाजत राजा
आन वरात दाराशी
वाजत गाजत राजा
आन वरात दाराशी
बेगीन वाजत गाजत राजा
आन वरात दाराशी…
गीत : पोरी तुझे नादान
गीतकार : प्रशांत नाकती
गायक : प्रशांत नाकती , सोनाली सोनवणे, चॅम्प डेव्हिल्झ
संगीत लेबल: Prashant Nakti Official