Pran Visava Lahari Sajan / प्राणविसावा लहरि सजण
प्राणविसावा ! लहरी सजण कुणी दावा !
फिरुन घरी यावा
पावसाची हवा ओढ लावी जीवा
शितळ शिडकावा !
कठिण दुरावा, सहन अजून किती व्हावा
धरुन धिरावा?
प्राण वेडापिसा एकलीने कसा
समय गुजारावा?
बहर फुलावा, फुलुन फुलुन विखरावा
हृदयी धरावा
कळ्या-पाकळ्या पाहता मोकळ्या
भरुन ऊर यावा !
गीत: शान्ता शेळके
संगीत: मीना खडीकर
स्वर: उषा मंगेशकर
गीत प्रकार: भावगीत