Raja Lalakari Ashi Ghe / राजा ललकारी अशी घे
राजा ललकारी अशी घे
हाक दिली, साद मला दे
कुंकवाचा माझा धनी, बळ वाघाचं आलंया
भरलेल्या मोटंवाणी मन भरून गेलंया
ओढ फुलाला वार्याची, जशी खूण इशार्याची
माझ्या सजणाला कळू दे
सूर भेटला सूराला, गाणं आलं तालावर
खुळ्या आनंदाचं माझ्या हासू तुझ्या गालावर
भरजरीचा हिरवा शेला पांघरून नवा
शिवार हे सारं खुलू दे
थेंब न्हवं हे घामाचं, त्याचं बनतील मोती
घास देईल सुखाचा, लई मायाळू ही माती
न्याहारीच्या वखूताला, घडीभर इसाव्याला
सावली ही संग मिळू दे
गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: अनिल-अरुण
स्वर: अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर
चित्रपट:अरे संसार संसार
गीत प्रकार: चित्रगीत, युगुलगीत