Raja Majha / राजं माझं
हो मातीचा या कणकण सांगतय
मावळ्यांच्या मना मंदी राहतय
आमच्या या जीवाची आस आमच राजं
आभाळाला भिडला ह्यो झेंडा बघा आज
आम्हा वरी कृपा करी राजांचं ध्यास लागतय
हे राजं माझं शिवबा राजं नाव तुमचं गाजतय
भगव सार आभाळ मानाचा मुजरा घालतंय
राजं माझं शिवबा राजं नाव तुमचं गाजतय
राजं राजं जगदंब जीव झाला हो दंग
दाही दिशात नाद घुमू दे
हरहर शिवराय मावळ्यांची तू माय
उभे स्वराज्य तुझ्यापाई हे
रुबाब असा भरदार मराठ्यांचा सरदार
आई जिजाऊचा तू छावा
माझा राजा
स्वारी ही आली माझ्या राजाची
सांगू किती गोड दिसे
कीर्ती ही थोर शिवरायांची
इवल्याशा मनी वसे
गुणगान गाऊ किती अशी तुमची ख्याती
नमन तुमचं रोज करतो पुजतो हो आम्ही
मनाच्या किल्ल्यात सिंहासन तुमचा
दैवत आमचे तुम्ही आम्हा लाभले
आम्हावरी कृपा करी राजांचा ध्यास लागतंय
हे राजं माझा शिवबा राजं
नाव तुमचं गाजतय
भगव सार आभाळ मानाचा मुजरा घालतय
हे राजं माझं शिवबा राजं नाव तुमचं गाजतय
हो नसानसा मंदी श्वासा श्वासा मंदी
भिनले तुम्ही राजं
पाना पणामधी दरी खोऱ्यामधी तुमची गाथा राजं
धुरंधर महाप्रतापी होणे नाही असा कदापी
जाणता राजा पराक्रमी जय भवानी जय शिवाजी
मर्द मराठा ऐसा अभिमान मातीचा
आम्हावरी कृपा करी राजांच ध्यास लागलाय
राजं माझं शिवबा राजं
नाव तुमचं गाजतय
भगव सार आभाळ मानाचा मुजरा घालतय
राजं माझा शिवबा राजं नाव तुमचं गाजतय.
गीत : राजं माझं
गीतकार : राहुल काळे,
गायक : सोनाली सोनवणे आणि मनीष राजगिरे
संगीत लेबल: मराठी मुसिक टाउन