Rajachya Rangmhali / राजाच्या रंगम्हाली
राजाच्या रंगम्हाली सोन्याचा बाई पलंग
रूप्याचं खांब त्येला मोत्याची झालर
राजाच्या रंगम्हाली पराची मऊ गादी
जरीचा चांदवा रेशमी शिनगार
गडनी सजनी गडनी सजनी ग
राजाच्या रंगम्हाली रानी की रुसली
बोलं ना हसं ना, उदास नजर
राजाच्या रंगम्हाली राजानं पुसीलं
डोळ्याची कमळं उघडा, व्हटाची डाळिंबं
गडनी सजनी गडनी सजनी ग
राजाच्या रंगम्हाली रानी वो सांगिते
सुना सोन्याईन म्हाल, कशाला बडिवार
मायेच्या पूतापायी रानी ग रडीते
आसवांची गंगा व्हाते भिजीला
पदोर गडनी सजनी गडनी सजनी ग
गीत: योगेश
संगीत: आनंदघन
स्वर: लता मंगेशकर, उषा मंगेशकर
चित्रपट: साधी माणसं
गीत प्रकार: चित्रगीत