Rupachi Nasha || रूपाची नशा
तुझा मुखडा माझे मनानं भरला
तुझ्या नावाला मी गो दिलावर कोरला
तुझा मुखडा माझे मनानं भरला
तुझ्या नावाला मी गो दिलावर कोरला
पोरी होशील का तू माझी
साथ देईन तुला जन्माची
तुला बनवूनशी माझी राणी
न घडवीन सफर ह्या दर्याची
तुझी अदा पोरी माझ्या मनानं गो भिडली
तुझ्या रूपाची नशा ह्या कालजानं गो चडली
तुझ्या रूपाची नशा ह्या कालजानं गो चडली
तुझ्या रूपाची नशा ह्या कालजानं गो चडली
गंध तुझा करी येरापिसा
रंग तुझा नवा मनी भरतो जसा
तुझ्या माग पोरी फिरतो कसा
तुझ्या पिरतीचा नाद मला लागला असा
हे गंध तुझा करी येरापिसा
रंग तुझा नवा मनी भरतो जसा
तुझ्या माग पोरी फिरतो कसा
तुझ्या पिरतीचा नाद मला लागला असा…
लांबुनी पाहुनी गो धड धड होतया माझ्या मना
हासुनी लाजुनी गो कळी खुलतंय तुझे गालान
पोरी होशील का तू माझी
साथ देईन तुला जन्माची
तुला बनवूनशी माझी राणी
न घडवीन सफर ह्या दर्याची
तुझी अदा पोरी माझ्या मनानं गो भिडली
तुझ्या रूपाची नशा ह्या कालजानं गो चडली
तुझ्या रूपाची नशा ह्या कालजानं गो चडली…
भास तुझा जेव्हा होतो खुळा
स्पर्श तुझा करी बावरा
अर्थ नात्यास हा
मग आला नवा
सहवास तुझा
वाटे हवा हवा
तुझ्या इश्कान रे पिरमान रे
रंगुनी चिंब मी झाले
आपल्या पिरमाच्या ह्या लाटेमधे
बेधुंद होऊनि न्हाले
सुरु होऊन नवी कहाणी
राजा तुझी मी होईल सजणी
मला बनवूनशी तुझी रे राणी
न घडव सफर ह्या दर्याची
रात पुनवेची जशी आभाळी र सजली
बात तुझ्या दिलाची ह्या मनाला र कळली
बात तुझ्या दिलाची ह्या मनाला र कळली
तुझ्या रूपाची नशा ह्या कालजानं गो चडली
तुझ्या रूपाची नशा ह्या कालजानं गो चडली…
गीत : रूपाची नशा
गीतकार : रोहन साखरे, वैशाली म्हस्के
गायक : सागर जे शिंदे , सोनाली सोनवणे
संगीत लेबल: Saisagar Entertainment