Sa Sagar Usale Kaisa / सा- सागर उसळे कैसा
मिळुनी घेऊ संगीत शिक्षणसुरू कशाने होते शिक्षण ?
ग म भ नसंगीताचा आरंभ कसा ?
संगीताचा आरंभ असा
सा रे ग म प ध नि सा
सा.. सा.. सा..
सागर करितो आवाज कैसा?
सागरास त्या येता भरती,
बुडुनी जाती पार किनारे.
चढत्या लाटांवरी तरंगत,
गलबत चाले घेउनी वेग.
गर्जत वाढी सिंधू दुर्गम,
मनुष्य करतो संगर अंतीम.
पडाव येती इवले झप झप,
तोडीत पाणी लाटा सप सप.
धरणी गाठी माणूस सावध,
ना तर सागर करता पारध.
नीलमण्यांच्या सुरसावाणी,
उसंबळे वर पाणी पाणी.
सारे सारे सरे शेवटी,
भरती नंतर पुन्हा ओहोटी.
सा रे ग म प ध नि सां रें सां नि ध प म ग रे सा
‘सा’ सागर उसळे कैसा
‘रे’ रेती बुडवी किनारे
‘ग’ गलबत चाले लगबग
‘म’ मनुष्य वादळी दुर्गम
‘प’ पडाव येती झप झप
‘ध’ धरणी गाठी सावध
‘नी’ निळ्या सागरी पोहुनी
सात स्वरांची ही कहाणी !
सागर.. सा
रेती.. रे
गलबत.. ग
मनुष्य.. म
पडाव.. प
धरणी.. ध
नीलम.. नी
सात स्वरांची ही कहाणी
गमप गमप निधपमपधनिसां
अचूक स्वरांवर गाता अक्षर
जन्मा येते गीत मनोहर
सारेगमपधनिसापसा
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: दत्ता डावजेकर
स्वर: आशा भोसले
चित्रपट: काका मला वाचवा
गीत प्रकार: बालगीत, चित्रगीत