Saath De Tu Mala / साथ दे तू मला
अलगद वाऱ्यावर उडती बट सांगते तुला
हलकेच लवती पापणी बघ सांगते तुला
गुंतले जीव हे आपले की जसे ओढ चंद्राची सागरा
साथ दे तू मला, साथ दे तू मला
कोरड्या मातीस ही सर पावसाची सावरे
मन पुन्हा का होत जाते वळिव-वेडे बावरे
चिंब हे सोहळे वाहती की जसे ये पुन्हा गारवा
का तुझ्यापाशीच मन हे येत जाते सारखे
अन पुन्हा तुझ्याविना हे जिंकुनी ही हारते
प्रेम हे पाखरू परतुनी की जसे सांजवेळी ये घरा
गीत : साथ दे तू मला
गीतकार : अश्विनी शेंडे, विश्वजीत जोशी
गायक : बेला शेंडे, हृषीकेश रानडे
संगीत लेबल: Everest Marathi