Sadhi Bholi Rani / साधी भोळी राणी
साधी भोळी राणी, साधा भोळा राजा
लाख मोलाचा ग संसार हा माझा
जणू झोपडीचा राजवाडा होई
हात जोडुनिया सुख उभं र्हाई
दाही दिशा वारा करी गाजावाजा
धरतीची शेज ढगांची वाकाळ
रोज दारी यावी सोन्याची सकाळ
जसा की चाफ्याचा वास ताजाताजा
येगळं कशाला लेऊ आता लेणं
किती तुला पाहू किती घेऊ दान
पापण्यांनी केला बंद दरवाजा
गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: यशवंत देव
स्वर: आशा भोसले
चित्रपट: मंत्र्यांची सून
गीत प्रकार: चित्रगीत