Sadi Dili Shambhar Rupayanchi / साडी दिली शंभर रुपयांची
झाली बहाल मर्जी सख्याची
साडी दिली शंभर रुपयांचीसाडी डाळिंबी हीच मी लेईन
अशी मलाच आयन्यात पाहीन
अशी चालन, अशी उभी राहीन
चारचौघांत नाही सांगायचीत्यांची माझी प्रीत चोरटी
गूज झाकून ठेवीन पोटी
हसू कोंडून धरीन ओठी
दृष्ट लागल आयाबायांची
साडी दिली शंभर रुपयांचीसाडी डाळिंबी हीच मी लेईन
अशी मलाच आयन्यात पाहीन
अशी चालन, अशी उभी राहीन
चारचौघांत नाही सांगायचीत्यांची माझी प्रीत चोरटी
गूज झाकून ठेवीन पोटी
हसू कोंडून धरीन ओठी
दृष्ट लागल आयाबायांची
संधी साधून ओढ्याकाठी
त्यांची एकान्ती घेईन भेटी
तेव्हा प्रीतीच्या बोलीन गोष्टी
आडपडदा नाही ठेवायची
त्यांची एकान्ती घेईन भेटी
तेव्हा प्रीतीच्या बोलीन गोष्टी
आडपडदा नाही ठेवायची
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: दत्ता डावजेकर
स्वर: आशा भोसले
चित्रपट: वैशाख वणवा
गीत प्रकार: लावणी, चित्रगीत