Sajani Sai Ga / साजणी सई ग
साजणी सई ग !
साजण नाही घरी, सुकली जाई ग !
दिसं गेले किती सखा दूरदेशी गेल्याला
पुशिते मी आसू त्याच्या रेशमी शेल्याला !
सोन्याच्या ताटामध्ये पक्वान्ने पाच ग !
संख्याच्या आठवाने घास जाईना ग !
चंदनी झोपाळा बाई हलतो ग डुलतो
भरजरी पदराचा शेव मागे झुलतो
पदराला आठवते सखयाची बोली ग !
ऐकताना होते माझी पापणी ओली ग !
गीत: शान्ता शेळके
संगीत: मीना खडीकर
स्वर: उषा मंगेशकर
गीत प्रकार: भावगीत