Samjun Ghena / समजून घे ना
नाजूकशा,
फुलाला या,
रागाचा रंग का?
मनाची या,
वाट तुझी,
मलाच बंद का?
किनारा तूच
माझ्या दर्याचा
चांदवा तूच गं
या सूर्याचा
ऐक ना..
बघ ना..
हस ना..
समजून घे ना
समजून घे ना
ओ आता माफ
कर ना
भोवरा मनाचा
तुझ्याच पाठी फिरे
क्षण हा प्रेमाचा
तुझ्याचसाठी झुरे
जाऊ नको दूर
तू…
लावून हुरहूर
तू…
समोर मी,
समोर तू,
तरीही लांब का?
किनारा तूच माझ्या
दर्याचा
चांदवा तूच गं
या सूर्याचा
ऐक ना..
बघ ना…
हस ना…
समजून घे ना!
समजून घे ना…
गीत : समजून घे ना
गीतकार : क्षितिज पटवर्धन
गायक : अमितराज आणि मुगदा कर्हाडे
संगीत लेबल: Everest Marathi