मराठी उखाणे

Satyanarayan Pooja Marathi Ukhane | सत्यनारायण पूजा उखाणे

Satyanarayan Pooja Marathi Ukhane

सत्यनारायण पूजेला बसण्याचा, मिळाला आम्हाला मान,
_______ रावांसोबत माझा संसार, असाच राहूदे छान.
सत्यनारायणाच्या पूजेने करू, नवीन कार्याची सुरवात,
_______ रावांचे नाव घेऊन, देवापुढे लावते फुल-वात.
वसंत ऋतू मध्ये, कोकिळा करते गुंजन,
_____ रावांसोबत करते मी, सत्यनारायणाचे पूजन.
आज आहे, श्रावणी पोळा,
________ रावांच्या जीवावर, शृंगार केले सोळा.
माय बाप सेवा, पवित्र हे कर्म,
_______ रावांचे नाव घेते, हिंदू हाच खरा धर्म.
बहुतेकांनी वाचले असेल, पुस्तक रामायण,
____ रावांचे नाव घेते, आज आहे सत्यनारायण.
सत्यनारायणासमोर मागणे मागते, सर्वांना मिळूदे चांगले आरोग्य,
________ रावांच्या रूपात भेटला, मला जीवनसाथी योग्य.
साई बाबांच्या चरणी, कीर्तन चालते मजेत,
______ रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या पूजेत.
गोंड्याचा हार, कंदीचे पेढे,
______ रावांचे नाव घेते, सत्यनारायणापुढे.
सत्यनारायणाला, नमस्कार करते जोडीने,
_______ रावांचे नाव घेते, सदा आवडीने.
पूजेला ठेवले आहे, भात आणि वरण,
____ रावांचे नाव घ्यायला आहे, सत्यनारायण पूजेचे कारण.
पूजेला बसणार म्ह्णून, घातला सदरा,
______ रावांनी आणला मला, मोगऱ्याचा गजरा.
सूर्य प्रकाशाने येते, पृथ्वीवर ऊर्जा,
_______ रावांसोबत करते, सत्यनारायणाची पूजा.
पूजेला जमले, सारे घर सोबती,
_____ रावांसोबत करते, सत्यनारायणाची आरती.
सत्यनारायण देवाला, हार घालते वाकून,
_______ रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांचा मान राखून.
देवाची आरती करताना, अंगात येते ऊर्जा,
______ रावांसोबत करते मी, सत्यनारायणाची पूजा.
सत्यनारायण पूजेला, बसलो दोघे जोडीने,
______ रावांचे नाव घेते, सदा आवडीने.
पूजेसाठी काढली रांगोळी, आणि दरवाजाला लावले तोरण,
_____ रावांचे नाव घेते, सत्यनारायण पूजेचे कारण.
सौभाग्यवती करतात, गौराईची पूजा,
_________ रावांचे नाव घेऊन, घेते मी रजा.
श्रावण महिनेच्या सुरवातीला येतात, गौरी गणपती,
_____________ राव आहेत माझे, प्रेमळ पती.
श्रावणात येतो, पर्जन्य वृष्टीला जोर,
________ रावांसारखे पती मिळण्यासाठी, भाग्य लागते थोर.
देवापुढे ठेवले, प्रसादाचे ताट,
________ रावांमुळे भेटली, माझ्या आयुष्याला वाट.
देवापुढे लावली, समईची जोडी,
_________ रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.
शंकरासाठी पार्वतीने, तपस्या उग्र केली,
__________ रावांनी मात्र मला, पाहता क्षणीच पसंती केली.
महाराष्ट्राची परंपरा म्हणजे, मंगळागौरीचा खेळ,
__________ रावांचे नाव घेते, सत्यनारायणाची वेळ.
श्रावणात हिरवा साज, सृष्टिदेवी सजली,
_________ रावांच्या सौख्यास्तव, मंगळगौर पुजली.
सुखी संसारासाठी, सर्वांनी झटावे,
_________ रावांचे नाव घेण्यास, मागे का हटावे.
पूजेला नटण्यासाठी, बायका असतात खूप हौशी,
_________ रावांचे नाव घेते, सत्यनारायण पूजेच्या दिवशी.
रातराणीच्या सुगंधाने, मन झाले मोहित,
________ रावांना आयुष्य मागते, सासू -सासर्‍यांना सहित.
तूच करता, आणि तूच करविता,
_________ रावांचे नाव घेते, शरण तुला भगवंता.
ऋतू सोबतीने, सारी जुनी झाडे नवी होता,
_________ रावांसोबत वाचेन मी, सत्यनारायणाची कथा.
गणपती बाप्पाला आवडती, तलावातील कमळे,
________ रावांसोबत, माहेर विसरून रमले.
श्रावणात महादेवाला, दुधाचा अभिषेक,
_______ रावांच्या नावाने, बेल वाहिले एकशे एक.

You may also like

मराठी उखाणे

Marathi Ukhane For Female | स्त्रियांसाठी मराठी उखाणे.

Marathi Ukhane For Female आई बाबांच्या प्रेमापुढे, नाही कोणाची गरज, ________ रावांचे माझ्यावर प्रेम पाहताच, मी त्यांना होकार दिला सहज.
मराठी उखाणे

Best Marathi Ukhane For Bride | नवरीसाठी उखाणे.

Best Marathi Ukhane For Bride पिवळा पितांबर, श्रीकृष्णाच्या अंगावर घातला, _____ रावांच्या जीवनासाठी, स्त्री जन्म घेतला. स्वातंत्र्याच्या होमकुंडात, वीरांनी घेतली