उषा मंगेशकर भावगीत मराठी गाणी शान्‍ता शेळके

Shalu Hirava Paach Marathi Lyrics | शालू हिरवा पाच नि

Shalu Hirava Paach / शालू हिरवा पाच नि

शालू हिरवा पाच नि मरवा वेणी तिपेडी घाला
साजणी बाई येणार साजण माझा !
गोऱ्या भाळी चढवा जाळी नवरत्नांची माळा
साजणी बाई येणार साजण माझा !

चूलबोळकी इवलीइवली भातुकलीचा खेळ ग
लुटूपुटीच्या संसाराची संपत आली वेळ ग
रेशिमधागे ओढिती मागे व्याकुळ जीव हा झाला

सूर गुंफिते सनई येथे झडे चौघडा दारी
वाजतगाजत मिरवत येईल घोड्यावरुनी स्वारी
मी वरमाला घालीन त्याला मुहूर्त जवळी आला

मंगलवेळी मंगलकाळी डोळा का ग पाणी?
साजण माझा हा पतिराजा मी तर त्याची राणी
अंगावरल्या शेलारीला बांधीन त्याचा शेला

 

गीत: शान्‍ता शेळके
संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर: उषा मंगेशकर 
गीत प्रकार: भावगीत


You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा