Sharad Sundar Chanderi / शारद सुंदर चंदेरी राती
शारद सुंदर चंदेरी राती,………2 स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत, घेऊन कवेत, साजणा झुलव मला
तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी, सगे सोयरे मी सांडीले पाठी…….2
शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला
मोहन मधूर राती, भराला येऊ दे प्रीती,
प्रीतीची ही जनरीती, कशाला कुणाची भिती
झाडामागे……… चांद हा वरती आला
ये ना ये ना, आतूर जीव हा झाला
मी भूलावे, स्वैर व्हावे, गीत गावे
शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत, घेऊन कवेत, साजणा झुलव मला
वार्यात लहर मंद, फुलांचा मादक गंध ,
मोगरा चमेली कुंद, जीवाला करीती धूंद,
माझ्या देही…. पूनव चांदणे साजे,
प्राणामध्ये….. प्रीतीची पावरी वाजे
आज राया, धूंद काया, मोह माया
शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत, घेऊन कवेत, साजणा झुलव मला
गीत: शान्ता शेळके
संगीत: हेमंत भोसले
स्वर: आशा भोसले
गीत प्रकार: भावगीत