Shivba Raja / शिवबा राजं
हे.. ऐ
मावळ आम्ही वादळ आम्ही
आरं मरणाचा बी काळ आम्ही
रण मस्तांची जात आमची
आरं भ्या कुणाला दावतो रं
प्रीत तलवारीशी नात हे मातीशी
भाकर सरनावरची रोज रं खायाची
रयतेचा राजा तो आम्ही हात रं तयाचं
जिकत नाही जवर तवर झुंजत ऱ्ह्ययाचं
तुकडे तुकडे झाले तरी बी
कणा कणा न झुजतो रं
हे मेल्या मना जाग यावी अशी त्याची भाषा रं.. हां
मेल्या मना जाग यावी अशी त्याची भाषा रं
मराठी या मातीची त्योच हाये आशा रं
दुश्मनाला धाक देई शिवरायांच नाव रं
दुश्मनाला धाक देई शिवरायांच नाव रं
हे शंभू शंकराच नव राजगड गांव रं
शिवबा राजं शिवबा राजं
शिवबा राजं राजा रं
शिवबा राजं शिवबा राजं
शिवबा राजं राजा रं
शिवबा राजं
शिवबा राजं
हे हित पाय ठेवण्या आंदी ईचार दोस्ता कर बरं, हां
हित पाय ठेवण्या आंदी ईचार दोस्ता कर बरं
कण कण रुद्र बनला शिरायांचा आधार
वाऱ्याचा ह्यो वणवा कसा, कसा तुला झेपलं
वाऱ्याचा ह्यो वणवा कसा, कसा तुला झेपलं
मराठा ह्यो आत्ता!
मराठा ह्यो आत्ता
मराठा ह्यो आत्ता उभी बादशाही ठोकलं
शिवबा राजं शिवबा राजं
शिवबा राजं राजा रं
शिवबा राजं शिवबा राजं
शिवबा राजं राजा रं
गीत : शिवबा राजं
गीतकार : दिग्पाल लांजेकर
गायक : अवधूत गांधी
संगीत लेबल: Zee Music Marathi