चित्रगीत मराठी गाणी शान्‍ता शेळके सुरेश वाडकर

Shodhito Radhela Shrihari Marathi Lyrics | शोधितो राधेला श्रीहरी

Shodhito Radhela Shrihari / शोधितो राधेला श्रीहरी

शारद पुनवा शांत चांदणे कालिंदीच्या तटी
गोपी जमल्या रास रंगला कदंबतरूतळवटी

दिसेना सखी लाडकी परि
शोधितो राधेला श्रीहरी !

इथे पाहतो तिथे पाहतो
मध्येच थबकुन उभा राहतो
बासरी मुकीच ओठांवरी
शोधितो राधेला श्रीहरी !

दरवळलेल्या कुंजानिकटी
इथेच ठरल्या होत्या भेटी
कशी ती वेळा टळली तरी
शोधितो राधेला श्रीहरी !

काय वाजले प्रिय ते पाऊल
तो तर वारा तिची न चाहूल
भास हो फसवा वरचेवरी
शोधितो राधेला श्रीहरी !

गीत: शान्‍ता शेळके
संगीत: अशोक पत्की
स्वर: सुरेश वाडकर
चित्रपट: हेच माझे माहेर
गीत प्रकार: चित्रगीत

You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते