Suravativar Tujhya Umatati / सुरावटीवर तुझ्या उमटती
सुरावटीवर तुझ्या उमटती अचूक कशी रे माझी गझले
कशास पुसशी प्रश्न प्रेयसी तुला समजले, मला समजले
मला समजले, तुला समजले
काल रात्री मी जाग जागलो अवघे जग जरी होते निजले
जागरणाचे कारण राजा तुला समजले, मला समजले
तीन दिवस ना भेट आपुली कितीदा माझे डोळे भिजले
आसूमागील भाव अनामिक तुला समजले, मला समजले
तुझ्या नि माझ्या मनात राणी गूज खोलवर एकच रुजले
कुजबुज काही केल्याविण ते तुला समजले, मला समजले
मनोरथांचा उंच मनोरा मजल्यावरती चढले मजले
मधुचंद्रास्तव लाभे वास्तू तुला समजले, मला समजले
मला आणखी तुला आपुले दोघांचेही भाव उमजले
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: एन्. दत्ता
स्वर: महेंद्र कपूर, आशा भोसले
चित्रपट: मधुचंद्र
गीत प्रकार: युगुलगीत, चित्रगीत