Swapnat Rangale Mi / स्वप्नात रंगले मी
स्वप्नात रंगले मी चित्रात दंगले मी
सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी
हे वेड प्रेमिकांचे गीतात गाइले मी
हे गीत भावनेचे डोळ्यांत पाहिले मी
या वृक्षवल्लरींना ही ओढ मीलनाची
पाहून जाणिली मी भाषा मुकेपणाची
माझ्या प्रियापुढे का लाजून राहिले मी
एकान्त हा क्षणाचा भासे मुहूर्तवेळा
या नील मंडपात जमला निसर्गमेळा
मिळवून शब्दसूर हे हार गुंफिले मी
घेशील का सख्या तू हातात हात माझा?
हळव्या स्वयंवराला साक्षी वसंतराजा
या जन्मसोबतीला सर्वस्व वाहिले मी
गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: सुधीर फडके
स्वर: सुधीर फडके, आशा भोसले
चित्रपट: आम्ही जातो अमुच्या गावा
गीत प्रकार: युगुलगीत, चित्रगीत