उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत

Swarg Mile Dharanila Marathi Lyrics | स्वर्ग मिळे धरणीला

Swarg Mile Dharanila / स्वर्ग मिळे धरणीला

स्वर्ग मिळे धरणीला कधी न ऐकिले
होईल का सफल कधी प्रेम आपुले?

दुनियेने अमृतास जहर मानिले
युगे युगे अमर असे प्रेम आपुले !

शुद्ध प्रेम अर्पिले अनारकलीने
सलीमाला राजसूख होतसे सुने
नर्तकीच्या दैवे का मरण कोरिले
होईल का सफल कधी प्रेम आपुले?

त्या वसंतसेनेचे वेड घेउनी
चारुदत्त रमुनी जाई प्रेमबंधनी
दोघांनी मिळून एक स्वप्न पाहिले
युगे युगे अमर असे प्रेम आपुले !

बाजीराव-मस्तानी प्रीतीची कथा
दोघांनी अंतरात लपविली व्यथा
मीलनात विरहाचे दु : ख साहिले
होईल का सफल कधी प्रेम आपुले?

राजा दुष्यंत बघे शकुंतलेला
दोघांनी परस्परां जीव वाहिला
पूर्णरूप प्रेमाने गीत गायिले
युगे युगे अमर असे प्रेम आपुले !

 

गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: एम्‌. शफी
स्वर: मन्‍ना डे, उषा मंगेशकर 
चित्रपट: श्रीमंत मेहुणा पाहिजे
गीत प्रकार: युगुलगीत, चित्रगीत

You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते