Tu Jithe Me Tithe / तू जिथे मी तिथे
तू जिथे मी तिथे
स्वप्न वेडे हंsssss आता
स्पर्श-ओल्या हंssss वाटा
मी न माझी राहिले आता
सहज सोपे ह्या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
हे असे माझे तुझे अन त्या ढगांवर चालणे
हो सहज सोपे ह्या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
हे असे माझे तुझे अन त्या ढगांवर चालणे
शोधते स्वतःला भेटुनी तुला
पण रस्ते नवे नेती कुठे नाही कळे मला
तू जिथे मी तिथे
स्वप्न वेडे पाहिले आता
स्पर्श-ओल्या मोकळ्या वाटा
मी न माझी राहिले आता
हो सहज सोपे ह्या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
हे असे माझे तुझे अन त्या ढगांवर चालणे
गुणगुणावे मी तुला मग तू मलाही सुचावे
बोलुनी झाले तरीही खूप काही उरावे
हंमम् हंमम्
गुणगुणावे मी तुला मग तू मलाही सुचावे
बोलुनी झाले तरीही खूप काही उरावे
हो बोलणे नको हे सांगणे आता
पण मग आपुल्या मौनास काही अर्थ ये नवा
तू जिथे मी तिथे
स्वप्न वेडे पाहिले आता
स्पर्श-ओल्या मोकळ्या वाटा
मी न माझी राहिले आता
हो ओssss
सहज सोपे ह्या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
हे असे माझे तुझे अन त्या ढगांवर चालणे
अंतरे संपून जावी, विरघळावे दुरावे
कोण होतो काय झालो ना मिळावे पुरावे
होओssss
अंतरे संपून जावी, विरघळावे दुरावे
कोण होतो काय झालो ना मिळावे पुरावे
सांगणे सुखाचे ऐकवू जगा
पण मग आपुल्या नात्यास काही अर्थ ये नवा
तू जिथे मी तिथे
स्वप्न वेडे पाहिले आता
स्पर्श-ओल्या मोकळ्या वाटा
मी न माझी राहिले आता
होओss तू जिथे मी तिथे
तू जिथे मी तिथे
होओ स्वप्न वेडे हंssss आता
स्पर्श-ओल्या हंssss वाटा
मी न माझी राहिले आता
गीत : तू जिथे मी तिथे
गीतकार : अश्विनी शेंडे
गायक : स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल
संगीत लेबल: Everest Marathi