आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Tu Udas Ka Marathi Lyrics | तू उदास का

Tu Udas Ka / तू उदास का

लहर धुंद सागरी, नजर धुंद लाजरी
नाचतो निसर्ग हा, तू उदास का असा तू उदास का

हवेत मंद गारवा, दिशादिशांत गोडवा
स्वप्नरम्य या क्षणी तुझाच ध्यास का

नभांत रंग खेळती हळूच रंग बोलती
आज या चराचरी तुझाच भास का

फुलून प्रीत राहिली, प्रिया तुलाच वाहिली
या प्रसन्न एकांती, तू निराश का

 

गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: दत्ता डावजेकर
स्वर: आशा भोसले
चित्रपट: पाच नाजूक बोटे
गीत प्रकार: चित्रगीत

You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते