Marathi Songs Music अवधूत गुप्ते मराठी गाणी स्वप्नील बांदोडकर

Tuch Majhi Aai Deva Lyrics || तूच माझी आई देवा लिरिक्स

Tuch Majhi Aai Deva / तूच माझी आई देवा 

तूच माझी आई देवा
तूच माझा बाप
गोड मानुनी घे सेवा
पोटी घाल पाप

चुकलेल्या कोकरा या वाट दाखवाया
घ्यावा पुन्हा अवतार बाप्पा मोरया

गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया
वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया

काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय
माझा श्वास ही तुझीच माया तुझे हात पाय

कधी घडविसी पापे हातून कधी घडविसी पुण्य
का खेळीसी खेळ असा हा सारे अगम्य
तारू माझे पैलतीरी पार कराया

गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया
वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया

ठाई ठाई रूपे तुझी चराचरी तूच
कधी होसी सखा कधी वैरी होसी तूच

देवा तुला देवपण देती भक्तगण
दानवांना पापकर्म शिकवितो कोण
निजलेल्या पाखरांना सूर्य दाखवाया

गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया
वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया

गीत : तूच माझी आई देवा
गायक : ज्ञानेश्वर मेश्राम , स्वप्नील बांदोडकर , अवधूत गुप्ते
संगीत लेबल: Everest Marathi

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा