ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत लता मंगेशकर

Tujhe Ni Majhe Ivale Gokul Marathi Lyrics | तुझे नि माझे इवले गोकुळ

Tujhe Ni Majhe Ivale Gokul / तुझे नि माझे इवले गोकुळ

तुझे नि माझे इवले गोकुळ
दूर आपुले वसवू घरकुल

घरट्यापुढती बाग चिमुकली
जाईजुईच्या प्रसन्‍न वेली
कोठे मरवा कुठे मोगरा
सतत उधळितो सुगंध शीतल

त्या उद्यानी सायंकाळी
सुवासिनी तू सुमुख सावळी
वाट पाहशील निज नाथाची
अधीरपणाने घेशिल चाहूल

चंद्र जसा तू येशिल वरती
मी डोळ्यांनी करीन आरती
नित्य नवी ती भेट आपुली
नित्य नवा तो प्रमोद निर्मल

गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: दत्ता डावजेकर
स्वर: पं. हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर
चित्रपट: सुखाची सावली
गीत प्रकार: युगुलगीत, चित्रगीत

You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते