Marathi Songs Music आदर्श शिंदे

Tula Japnar Aahe Lyrics || तुला जपणार आहे लिरिक्स

Tula Japnar Aahe  || तुला जपणार आहे 

कधी हसणार आहे
कधी रडणार आहे
मी सारी जिंदगी माझी,
तुला जपणार आहे

तुझे सारे उन्हाळे
हिवाळे पावसाळे
मी सोबत हात कायमचा
तुझा धरणार आहे

मी सारी जिंदगी माझी,
तुला जपणार आहे
कधी वाटेत काचा,
कधी खळगे नी खाचा
तुझ्या आधी तिथे पाय,
हा पडेल माझा
तू स्वप्न पहात जा ना
तू बस खुशीत रहा ना
माझ्याही वाट्याचे
घे तुला सारे

मी सारी जिंदगी माझी,
तुला जपणार आहे

कधी सगळ्यात आहे
कधी आपल्यात आहे
हि माझी काळजी सारी
तुला पुरणार आहे
कधी असणार आहे
कधी नसणार आहे
तरीही आरश्यात मी
तुझ्या दिसणार आहे
मी सोबत हात कायमचा
तुझा धरणार आहे

मी सारी जिंदगी माझी,
तुला जपणार आहे

गीत : तुला जपणार आहे
गीतकार : क्षितिज पटवर्धन
गायक : आदर्श शिंदे आणि रोंकिनी गुप्ता
संगीत लेबल: Zee Music Marathi

You may also like

Marathi Songs Music Zee Music Company मराठी गाणी

Datale Reshami Marathi Lyrics || दाटले रेशमी

Datale Reshami Aahe Dhuke Dhuke / दाटले रेशमी आहे धुके धुके मौला इश्क है खुदा दुहाई देती है जुबान दाटले
Marathi Songs Music Zee Music Company अजय गोगावले मराठी गाणी

Koral Naav Marathi Lyrics || कोरलं नाव मराठी लिरिक्स

Koral Naav / कोरलं नाव कोरलं नाव मी श्वासवरी पेरलं काटं तू पायी जरी कोरलं नाव मी श्वासवरी पेरलं काटं