Tula Pahate Re Tula Pahate / तुला पाहते रे तुला पाहते
तुला पाहते रे तुला पाहते
तुझी मूर्त माझ्या उरी राहते
तुला पाहते रे, तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते !
तुझ्या संगतीचा जीवा ध्यास लागे
तुझ्या हासण्याने मनी प्रीत जागे
तुझ्या गायने मी सुखी नाहते !
किती भाग्य या घोर अंधेपणीही
दिसे स्वप्न झोपेत जागेपणीही
उणे लोचनांचे सुखे साहते !
कधी भक्त का पाहतो ईश्वराला?
नदी न्याहळी का कधी सागराला?
तिच्यासारखी मी सदा वाहते !
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: सुधीर फडके
स्वर: आशा भोसले
चित्रपट: जगाच्या पाठीवर
गीत प्रकार: युगुलगीत, चित्रगीत