भावगीत मराठी गाणी श्रीधर फडके सुरेश वाडकर

Tula Pahile Mi Nadichya Marathi Lyrics || तुला पाहिलें मी नदीच्या

Tula Pahile Mi Nadichya / तुला पाहिलें मी नदीच्या

तुला पाहिलें मी नदीच्या किनारीं
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथें दाट छायांतुनी रंग गळतात
या वृक्षमाळेंतले सावळे !

तुझीं पावलें गे धुक्याच्या महालांत
ना वाजलीं ना कधीं नादलीं
निळागर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन्‌ तुला सावली..

मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे कां उभी तूं, तुझें दुःख झरतें?
जसे संचिताचे ऋतू कोवळे..

अशी ओल जातां तुझ्या स्पंदनांतून
आकांत माझ्या उरीं केवढा !
तमांतूनही मंद तार्‍याप्रमाणें
दिसे कीं तुझ्या बिल्वरांचा चुडा

 

गीत: ग्रेस
संगीत: श्रीधर फडके
स्वर: श्रीधर फडके, सुरेश वाडकर
गीत प्रकार: भावगीत

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा