आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लावणी

Tumhi Majhe Bajirav Marathi Lyrics | ​तुम्ही माझे बाजीराव

Tumhi Majhe Bajirav / ​तुम्ही माझे बाजीराव

माझ्यासाठी दिली राहुटी, इतरांना मज्जाव
तुम्ही माझे बाजीराव

मी मस्तानी, हिंदुस्तानी, बुंदेली पेहेराव
झिरझिरवाणी, निळी ओढणी, वाळ्याचा शिडकाव

तुम्ही मराठे, नव्हे छाकटे, अगदी सरळ स्वभाव
शूर शिपाई, तुमची द्वाही, चारी मुलखी नाव

उभी अंगलट, तांबुस फिक्कट, नयनीं दाटला भाव
बोलांवाचुन, ख्यातीवाचुन, अर्जी आविर्भाव

काल दुपारी, भरदरबारी, उरी लागला घाव
मी पण चळले, तुम्हा भाळले, आता नाही निभाव

दिठीदिठीचा, नजरमिठीचा, हो‍ऊ द्याच सराव
या पायांसी, मज दासीसी, मिळेल का कधी वाव ?

 

गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: वसंत पवार
स्वर: आशा भोसले
चित्रपट: वैजयंता
गीत प्रकार: लावणी, चित्रगीत

You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते