De Dhakka Marathi Songs Music मराठी गाणी

Ugavali Shukrachi Chandani Lyrics || उगवली शुक्राची चांदणी

Ugavali Shukrachi Chandani / उगवली शुक्राची चांदणी

अडवू नका मज सोडा आता,
पुरं झालं ना धनी
उगवली शुक्राची चांदणी

हिचं ऐका पाव्हणं,
काय हे वागणं
शोभतंय्‌ व्हय्‌ तुम्हाला ?

हिचा हात धरून,
गालामध्ये हसणं
शोभतंय्‌ का तुम्हाला ?

जरा लाज धरा हो येता-जाता
पाहिल्‌ ना हो कुणी

उगवली शुक्राची चांदणी

निरव शांतता अवतीभवती,
रातकिडं हे किरकिर करती
भिरभिर उडती वर पाकोळ्या
धडधड होते मनी
उगवली शुक्राची चांदणी !

लवलव करिती हिरवी पाती,
चमचमणार्‍या चांदणराती
वार्‍यावरती गंध दरवळे
केतकीच्या या बनी
उगवली शुक्राची चांदणी !

गीत : उगवली शुक्राची चांदणी
गीतकार : श्रीरंग गोडबोले आणि अभिजीत देशपांडे
गायक : आरती अंकलीकर
संगीत लेबल: Zee Music Marathi

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा