Utha Re Raghava / ऊठ रे राघवा
ऊठ रे राघवा, उघड लोचन अता
सूर्य क्षितिजावरी कांचनाच्या रथी
रत्नकण सांडले या सुनिर्मल पथी
देव प्राचीवरी उधळती वैभवा
पाखरांचे गळे जाहले मोकळे
किरण पाण्यावरी उतरले कोवळे
उमलल्या पाकळ्या, जाग ये राजिवा
जाग रे राजसा संपली ही निशा
गंध चोहीकडे उजळल्या दशदिशा
तेज-आनंद रे तूच माझ्या जीवा
गीत: मंगेश पाडगांवकर
संगीत: विश्वनाथ मोरे
स्वर: उषा मंगेशकर
गीत प्रकार: भावगीत