Vaat Reshami Phulaphulat / वाट रेशमी फुलाफुलांत
वाट रेशमी फुलाफुलांत नाहते
बाहुपाशी राजसा बहरुनी विसावते
स्पर्श हा नवा, प्रीत ही शहारते
लाजण्यातुनी तुझ्या हळुच गूज सांडते
हवेतुनी सुगंध हा दरवळे पुन्हा
घडायचा पुन्हा पुन्हा लाजरा गुन्हा
पापण्या मिटून घे स्वप्न एक जागते
वादळे उरातली सांगती तुला
रेशमी वयात हा झुलायचा झुला
चंदनी वयातुनी धुकेच स्वैर वाहते
आसमंत हा वसंत आज वेगळा
अधीर मी मंदिर तू गारवा खुळा
दुरावताच स्पर्श हे, कोण ओढ लाविते !
गीत: प्रवीण दवणे
संगीत: दीपक पाटेकर
स्वर: अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर
चित्रपट: अंगार
गीत प्रकार: चित्रगीत, युगुलगीत