मराठी उखाणे

Vat Purnima Ukhane Marathi | वटपौर्णिमा उखाणे

Vat Purnima Ukhane Marathi

वडाची पूजा करते, ठेवुनी निर्मळ मन,
______ रावांचे नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा सण.
देवच बनवतो, ७ जन्माची गाठ,
_______ रावांच्या दीर्घआयुष्यासाठी, वडाला फेरे मारते सात.
वटपौर्णिमा म्ह्णून आज, बाजारातून आणले फणसाचे गरे,
___________ रावांचे नाव घेते, अशेच सुखी राहुद्यात सारे.
आज वटपौर्णिमा म्हणून, सात फेरे मारते मी वडाला.
सातही जन्मी मिळूदे _____ रावांसारखे पती, असे मागणे मागते देवाला.
आज मागणे मागते देवाला, पूर्ण होऊदेत तुमच्या ईच्छा,
______ रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
वडाला घालते फेरे, आणि देवाला करते नवस,
_____ रावांचे नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा दिवस.
लग्नानंतर वटपौर्णिमेचा, माझा पहिला आहे सण,
_________ रावांचे नाव घेते, ठेवून निर्मळ मन.
झाडे लावा, झाडे तोडून नका देऊ निसर्गाला त्रास,
_______ रावांचे नाव घेते, आज वटपौर्णिमेसाठी खास.
मराठी सण म्हणजे, आनंदाचा क्षण,
_______ रावांचे नाव घेते, सुखी राहुदेत सर्वजण.
पावसाची झाली सुरवात, आणि आज आहे पहिला सण,
वटवृक्ष बहरले तसेच ______ रावांचे बहरूदे, नेहमी मन.
पावसाच्या येण्याने, पक्षांचे चालले आहे कूजन,
________ रावांचे नाव घेते, आणि वडाचे करते पूजन.
सुहासिनींचा मेळा जमला, वटपौर्णिमेसाठी,
_______ रावांचे नाव घेऊन, निघाले मी वडाच्या पूजेसाठी.
पावसाच्या सुंदर वातावरणाने, सुखी आहेत पक्षी,
________ रावांचे नाव घेते, तुम्ही आहात सर्वजण साक्षी.
वटपौर्णिमा आहे, सुहासिनींसाठी मोठा सण,
_______ रावांनी जिंकले, पहिल्या भेटीतच माझे मन.
वटपौर्णिमेला, फणसाची असते खूप मागणी,
______ रावांची ७ जन्मासाठी, बनेल मी साजणी.
वट पौर्णिमेचे व्रत, निष्टेने करते,
_______ रावांसाठी मी, दीर्घायुष्य मागते.
पतीच्या दीर्घयुष्यासाठी, निष्ठेचे बंधन,
______ रावांचे नाव घेऊन करते, सर्वांना वंदन.
आयुष्यात सुख- दुःख, दोन्ही असावे.
_______ रावांसारखे पती, जन्मो-जन्मी मिळावे.
संत तुकोबाची वाणी, भक्तीची ती शिकवणी,
________ रावांचे नाव घेते, आज गाऊया सुवासिनींसाठी गाणी.
आजच्या दिवशी, वडाची पूजा करण्याची आहे प्रथा,
________ रावांसोबत ऐकेन मी, सावित्री आणि सत्यवानाची कथा.
प्रार्थना सौभाग्याची, पूजा वटपौणिमेची,
________ रावांचे नाव घेते, सून देशमुखांची.
थाटात पार पडला, आज वटपौर्णिमेचा सोहळा,
_______ रावांचे नाव ऐकण्यास, सर्वजण झाले गोळा.
चांदणचाहूल होती, कोवळ्या पाऊली,
_________ रावांची सर्व इच्छा पूर्ण होवो, अशी मागणी करते मी तुझ्याकडे वटसावित्री माऊली.
सौभाग्यवतींसाठी आहे, वटपौर्णिमेचा सण मोठा,
_________ रावांचे नाव घेते, कधीही नको होउदे त्यांना तोटा.
वटपौर्णिमा आहे म्हणून, आज नेसली नवीन साडी,
______ रावांनी आज फिरायला न्हेण्यासाठी बुक केली, ४ चाकी गाडी.
श्रावणात आकाशात पसरला, इंद्रधनुष्याच्या रंग,
________ राव नेहमी सोबत असूदेत, माझ्या संग.
सृष्टीने जसे वडाचे झाड, वर्षानुवर्षे जपले,
_______ सुखी राहूद्या जन्मोजन्मी, असेच नाते अपुले.
वटवृक्ष म्हणजे, निसर्गाचा अनमोल ठेवा,
________ रावांची मी, आयुष्यभर करेन सेवा.
पाच सुहासिनी स्त्रियांची, ओटी मी भरली,
_____ रावांचे नाव घेते, आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सजली.
कांजीवरम साडी, बनारसी खण,
_____ रावांचे नाव घेते, आज आहे_____ सण.
सत्यवानाचे प्राण वाचवून, वाढविली सावित्रीने सर्वांची शान,
___________ रावांचे नाव घेताना, मला फार वाटतो अभिमान.
वटवृक्षाचे झाड लावून करूया, वटपौर्णिमा साजरी,
__________ राव म्हणतात, मी आहे फार लाजरी.
वडाची पूजा करून, गुंडाळते सफेद धागा,
_____ रावांच्या जीवनात, सदैव असुदे माझ्यासाठीच जागा.
पोथी, पुराणे वाचून, बोध होतो मनाला,
_______ रावांचे नाव घेते, वड सावित्री सनाला.
वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी, जमल्या साऱ्या बायका,
_____ रावांचे नाव घेते, सर्वजण ऐका.
वडाची फांदी लावून, करते मी वृक्षारोपण,
_________ रावांच्या म्हणण्याप्रमाणे करेन, मी परिवाराचे संगोपन.
वडाची पूजा करते, आणि मागणे मागते सुखी राहूदे सृष्टी,
________ रावांचे नाव घेते, देवा नेहमी असुदे आमच्यावर तुझी दृष्टी.
आज आहे माझी पहिली, वट सावित्री,
________ रावांचे नाव घेते, होऊदेत त्यांची अखंड किर्ती.
वटपौर्णिमा म्हणजे, साथ जन्माच्या गाठी,
________ राव भेटूदेत मला, सात जन्मासाठी.
देव आहे चोहीकडे, डोळे मिटून बघावे,
_________ रावांचे नाव घेते, सर्वांनी ऐकावे.
आज आहे वटपौर्णिमेचा सण,
______ रावांचे सुखी राहूदेत तन, मन, धन.
वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला, गुंडाळतात धागा,
__________ रावांसाठी माझ्या मनात कधीही, कमी नाही होणार जागा.
झाडे लावा झाडे जगवा, अशी मी करते आपल्याकडे मागणी,
________ रावांचे नाव घेते, साथ जन्मी असूदेत, त्यांची मी साजणी.
आज आहे वटपौर्णिमा, म्हणून ठेवला मी उपवास,
_____ रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांसाठी खास.
मराठी संस्कृतीची प्रतिमा, सावित्रेच्या निष्ठेचे दर्पण,
_______ रावांसाठी करते मी, माझे जीवन अर्पण.
पाऊस पडताच, उजळून जाती सृष्टी,
______ आणि _______च्या नात्याला, नको लागो कोणाची द्रुष्टी.
हृदयाचा ठोका, शरीराचा झोका,
आज वटपौर्णिमा आहे म्हणून, _____ रावांचे नाव घेण्याचा, भेटला मला मोका

You may also like

मराठी उखाणे

Marathi Ukhane For Female | स्त्रियांसाठी मराठी उखाणे.

Marathi Ukhane For Female आई बाबांच्या प्रेमापुढे, नाही कोणाची गरज, ________ रावांचे माझ्यावर प्रेम पाहताच, मी त्यांना होकार दिला सहज.
मराठी उखाणे

Best Marathi Ukhane For Bride | नवरीसाठी उखाणे.

Best Marathi Ukhane For Bride पिवळा पितांबर, श्रीकृष्णाच्या अंगावर घातला, _____ रावांच्या जीवनासाठी, स्त्री जन्म घेतला. स्वातंत्र्याच्या होमकुंडात, वीरांनी घेतली