Vikal Sanj Veli / विकल सांजवेळी
विकल सांजवेळी डोळ्यांत आले पाणी
फिरून आठवे रे चुकली प्रेमकहाणी
उदास होता वारा, उदास नदीकाठ
मुकेच झाले ओठ गिळून सारी गाणी
चुकले कुठे काही कळले कसे नाही
घेरल्या दिशा दाही अशुभ सावल्यांनी
गीत: शान्ता शेळके
संगीत: मीना खडीकर
स्वर: उषा मंगेशकर
गीत प्रकार: भावगीत