Vithu Mauli Tu Mauli Jagachi / विठुमाउली तू माउली जगाची
विठुमाउली तू माउली जगाची
माउलीत मूर्ति विठ्ठलाची
विठ्ठला ऽ मायबापा ऽऽ
काय तुझी माया सांगू श्रीरंगा
संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा
डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला ऽ पांडुरंगा ऽऽ
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची
माउलीत मूर्ति विठ्ठलाची
विठ्ठला ऽ मायबापा ऽऽ
लेकरांची सेवा केलीस तू आई
कसं पांग फेडू? कसं होऊ उतराई?
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला ऽ मायबापा ऽऽ
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची
माउलीत मूर्ति विठ्ठलाची
विठ्ठला ऽ मायबापा ऽऽ
गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: अनिल-अरुण
स्वर: जयवंत कुलकर्णी, सुधीर फडके, सुरेश वाडकर
चित्रपट:अरे संसार संसार
गीत प्रकार: चित्रगीत