Ya Dolyanchi Don Pakhare / या डोळ्यांची दोन पाखरे
या डोळयांची दोन पाखरे फिरतिल तुमच्या भवती
पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती या डोळयांची दोन पाखरे फिरतिल तुमच्या भवती पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगतीदर्शन तुमचे हाच असे हो या पक्ष्यांचा चारा
सहवासविण नकोच यांना अन्य कोठचा वारा तुमचा परिसर यांस नभांगण घरकुल तुमची छाती पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगतीसावलीत ही बसतील वेडी प्रीतीच्या दडुनी
एका अश्रुमाजी तुमच्या जातील पण बुडूनी नव्हेत डोळे नव्हेत पक्षी ही तर अक्षय नाती पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती या डोळयांची दोन पाखरे फिरतिल तुमच्या भवती पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: दत्ता डावजेकर
स्वर: आशा भोसले
चित्रपट: पाठलाग
गीत प्रकार: चित्रगीत