Ya Gharchi Mi Jhale / या घरची मी झाले गृहिणी
नव्हे किशोरी किंवा रमणी
या घरची मी झाले गृहिणी
सान दिराची करिता सेवा
नवी भावना येई अनुभवा
वात्सल्याने मन ओथंबे चिमणे मुख पाहुनी
वडील दिराचे वाटतसे भय
दास्य जाणवे, आठवते वय
स्वामित्वच ते घरी वावरे नमते पदी धरणी
कष्ट उपसणे मिटल्या ओठी
सुसह्य मज हो एकासाठी
सौभाग्याचे धनी लाभले प्रेमळ अन् सद्गुणी
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: प्रभाकर जोग
स्वर: आशा भोसले
चित्रपट: घरगंगेच्या काठी
गीत प्रकार: चित्रगीत