Raya Chala Ghodyavarati / राया चला घोड्यावरती बसू
रात अशी बहरात राजसा, तुम्ही नका ना रुसू
अहो राया चला घोड्यावरती बसू !
नवा देखणा आणा घोडा
जीन कसुनी लगाम जोडा
झुलती रिकीब खाली सोडा
उगा वाटतं खूप फिरावं
नकाच काही पुसू
अहो राया चला घोड्यावरती बसू !
नेशिन साडी नव्या घडीची
गर्भरेशमी लाल खडीची
चोळी घालीन वर ऐन्याची
निळ्या मोकळ्या आभाळावर
चंद्र लागला दिसू
अहो राया चला घोड्यावरती बसू !
मंदिल चढवा बांधा शेला
उचलून घ्या ना पुढ्यात मजला
हलक्या हाताने विळखा घाला
मिठीत येईल पुनव नभीची
कसलं आलं हसू अहो
राया चला घोड्यावरती बसू !
गीत: वसंत सबनीस
संगीत: राम कदम
स्वर: उषा मंगेशकर
चित्रपट: सोंगाड्या
गीत प्रकार: लावणी, चित्रगीत