Kadhi Re Pahin Dola Tula / कधी रे पाहिन डोळां तुला
कधी रे पाहिन डोळां तुला?
सोनुल्या देवाघरच्या फुला
कस्तुरी-हरिणाच्या उदरी
हरीने साठविली कस्तुरी
सुगंधे हरिणच वेडावला !
देव तू येशिल माझ्या घरी
तुझ्यास्तव अमृत माझ्या उरी
कधी ते भरविन बाळा तुला?
फुला, तू संसारी मंगल
फुला, तू फुलाहुनी कोमल
करिन या तळहाताचा झुला
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: वसंत पवार
स्वर: आशा भोसले
चित्रपट: बाळा जो जो रे
गीत प्रकार: चित्रगीत