Maval Jaga Zala Ra || मावळ जाग झाल र
मावळं जागं झालं रं, तांबडं फुटलं भगवं जी..
गुलामी अंधार फिटं… सूर्य शिवबा उगवं जी..
मावळच्या मातीला जाग ही आली
तुमच्यापायी धरनी पावन जाली..
सह्याद्रीला आज येतीया जाग..
दख्खनचा गर्व ह्ये शिवाजी राजं..
हे सर्जा रं..
सोन्याच्या फाळानं शेतीची लेणी
कोरून काढी ह्यो मराठा मानी..
आधार जेयांचा मानी बळीराजं..
दख्खनचा गर्व ह्ये शिवाजी राजं..
शिवबा रं.. राजं रं.. मावळचं धनी
शिवबा राजं मर्दानी…
बिरुबा.. खंडुबा.. जोतिबा जो मनी
शिवबा तैसा मर्दानी..
काळाच्या ह्या.. भाळावरी
रेखियले भाग्य ऐसे तुम्ही..
जिजाईचा पुत्र असा
कनवाळू मायाळू राजं तुम्ही..
जीव प्रान वाहू पायी
संगती राहूया झुंजमंदी..
आशीर्वादे अंबाबाई..
शिवरायांना यश देई..
दुस्मन हा दबला हरला मावळा जितला तुमचा राजं
मावळ जागं झालं रं..
मराठा ऐसा तुमचा बुलंद गर्जे घुमला राजं..
मावळ जागं झालं रं..
मावळं जागं झालं रं, तांबडं फुटलं भगवं जी..
गुलामी अंधार फिटं सूर्य सिवबा उगवं जी..
शिवबा रं.. राजं रं.. मावळचं धनी
शिवबा राजं मर्दानी…
बिरुबा.. खंडुबा.. जोतिबा जो मनी
शिवबा तैसा मर्दानी..
गीत : मावळ जाग झाल र
गीतकार : दिग्पाल लांजेकर
गायक : देवदत्त मनीषा बाजी, अवधूत गांधी
संगीत लेबल: Everest Marathi