Aaj Majhya Aksharana Vachan De/ आज माझ्या अक्षरांना वचन दे
आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे
या स्वरांच्या चांदण्याला गगन दे रसिका तुझे
अक्षरांच्या लोचनांतून गगन जरि हे निथळले
मी तुझ्यासाठीच केवळ बहर माझे उधळले
कल्पना वेलीस माझ्या सुमन दे रसिका तुझे
मी जगाचे ओठ झालो बोलतो आहे खरे
दुःखितांचे दुःख माझ्या अक्षरांतून पाझरे
आसवें बघण्या व्यथांची नयन दे रसिका तुझे
काळजामाजि फुलांच्या भावना ओथंबल्या
एवढ्यासाठीच रात्री तारका खोळंबल्या
आज कवितेच्या उषेला किरण दे रसिका तुझे
गीत: रमन रणदिवे
स्वर: सुरेश वाडकर
गीत प्रकार: भावगीत