भावगीत मराठी गाणी सुरेश भट सुरेश वाडकर

Aatach Amrutachi Barsun Marathi Lyrics || आताच अमृताची बरसून

Aatach Amrutachi Barsun/ आताच अमृताची बरसून 

आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली

मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली

उरले जराजरासे गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली

अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्‍याचा..
गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली?

 

गीत: सुरेश भट
संगीत: रवि दाते
स्वर:  सुरेश वाडकर
गीत प्रकार: भावगीत

 

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा