ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत लता मंगेशकर लावणी सुधीर फडके

Asa Nesun Shalu Hirava Marathi Lyrics | असा नेसून शालू हिरवा

Asa Nesun Shalu Hirava / असा नेसून शालू हिरवा

असा नेसून शालू हिरवा आणि वेणीत खूपसुन मरवा
जाशी कुणीकडे, कुणाकडे, सखे सांग ना
का ग बघतेस मागे-पुढे?

का रे वाटेत गाठून पुसशी, का रे निलाजर्‍या तू हसशी
जाते सख्याकडे, प्रियाकडे, तुला सांगते-
त्याची माझी रे प्रीत जडे

तुजपरी गोरी गोरी, चाफ्यावानी सुकुमारी
दुपारचा पार ऊन जळते ग वर ऊन जळते

टकमक बघू नको, जाऊ नको तिच्या वाटे
का रे उठठेव, तिला कळते रे तिची तिला कळते

का ग आला असा फणकारा, कंकणाच्या करीत झणकारा
जाते कुणीकडे, कुणाकडे, सखे सांग ना
का ग बघतेस मागे-पुढे?

दूर डोंगरी घुमते बासरी, चैत्र बहरला वनामधी
पदर फडफडतो, ऊर धडधडतो, प्रीत उसळते मनोमनी
मी भल्या घरातील युवती, लोक फिरतात अवतीभवती
जाते सख्याकडे, प्रियाकडे, खरं सांगते-
म्हणून बघते मी मागे-पुढे

 

गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: मास्टर कृष्णराव
स्वर: लता मंगेशकर, सुधीर फडके,
चित्रपट: कीचकवध
गीत प्रकार: युगुलगीत, लावणी, चित्रगीत


You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते