Sasarchya Ghari Aale / सासरच्या घरी आले
सासरच्या घरी आले माहेर माहेरा
माय काय सासू झाली पिता तो सासरा
माझ्या आधी आली येथे नांदण्यास माया
पदोपदी छाया येथे सुखावली काया
किती दुवा देऊ तुजसी ईश्वरा उदारा
हवे तेच लाभले मजसी हवे तेच त्यांना
मूर्तरूप आले मनीच्या मुक्या कल्पनांना
उभय मानसांच्या वेला बहरला फुलोरा
उणेपणा नाही तिळही राहिला सुखाला
मेण होऊनिया जडले भाग्य कुंकवाला
सौख्यसागरासी नाही राहिला किनारा
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: दत्ता डावजेकर
स्वर: आशा भोसले
चित्रपट: वैशाख वणवा
गीत प्रकार: चित्रगीत