चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत श्रीधर फडके सुधीर फडके सुरेश वाडकर

Disa Jateel Disa Yeteel Marathi Lyrics | दिसं जातील दिसं येतील

Disa Jateel Disa Yeteel / दिसं जातील दिसं येतील

तुज्यामाज्या संसाराला आणि काय हवं
तुज्यामाज्या लेकराला घरकूल नवं
नव्या घरामंदी काय नवीन घडलं
घरकुलासंगं सम्दं येगळं होईल
दिसं जातील, दिसं येतील
भोग सरंल, सुख येईल

अवकळा सम्दी जाईल निघुनी
तरारेल बीज तुजं माझ्या कुशीतुनी
मिळंल का त्याला ऊन वारा पाणी?
राहील का सुकंल ते तुज्यामाज्यावानी?
रोप अपुलंच पर होईल येगळं
दैवासंग झुंजायाचं देऊ त्याला बळ

ढगावानी बरसंल त्यो, वार्‍यावानी हसवंल त्यो
फुलावानी सुखवील, काट्यांलाबी खेळवील
समद्या दुनियेचं मन रिझवील त्यो
असंल त्यो कुनावानी, कसा ग दिसंल
तुज्यामाज्या जिवाचा त्यो आरसा असंल

उडुनिया जाईल ही आसवांची रात
आपुल्याचसाठी उद्या फुटंल पहाट
पहाटच्या दंवावानी तान्हं तुजंमाजं
सोसंल ग कसं त्याला जीवापाड ओझं
इवल्याशा पणतीचा इवलासा जीव
त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव

 

गीत: सुधीर मोघे
संगीत: सुधीर फडके
स्वर: आशा भोसले,  सुरेश वाडकर
चित्रपट: शापित
गीत प्रकार: चित्रगीत, युगुलगीत

 

You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते