Guru Ek Jagi Trata / गुरु एक जगी त्राता
सुखाच्या क्षणांत, व्यथांच्या घणांत
उभा पाठीशी एक अदृश्य हात
गुरु एक जगी त्राता
गुरु दयासिंधु, गुरु दीनबंधु
गुरु जननि जन्मदाता
घन तमांत जणू दीप चेतवी
तनमनांत चैतन्य जागवी
कणकणात जणू प्राण डोलवी
जे अरूप त्या देई रूप
करी मूर्त तो अमूर्ता
गुरु एक जगी त्राता
गुरु समान कुणी नाही सोयरा
गुरुविण नाही थारा
गुरु निधान गुरु मोक्ष आसरा
देव दैव लाभे सदैव-
गुरुचरण लाभ होता
गुरु एक जगी त्राता
गीत: सुधीर मोघे
संगीत: सुधीर फडके
स्वर: पं. जितेंद्र अभिषेकी, सुधीर फडके, सुरेश वाडकर
राग: पूर्वा कल्याण
गीत प्रकार: चित्रगीत