मराठी उखाणे

Haldi Kunku Ukhane Marathi | हळदी कुंकू उखाणे

Haldi Kunku Ukhane Marathi

गोकुळ झाल दंग, पाहून श्रीकृष्णाचे खेळ,
______ रावांचे नाव घेते, आज आहे हळदी कुंकवाची वेळ.
श्रीकृष्ण रास खेळे, गोपिकेच्या मेळी,
______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या वेळी.
आज ठेवला आहे, संगीत खुर्चीचा खेळ,
______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंची वेळ.
हळदीचा रंग आहे पिवळा, आणि कुंकूचा लाल,
_________ रावांच्या जिवनात, आहे मी खुशहाल.
हळदी कुंकवाला जमला, सुवासिनींचा मेळ,
_______ रावांचे नाव घेण्याची, हीच ती खरी वेळ.
गणपती बाप्पा, वंदन करते तुला,
_____रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला.
जळगाव फेमस आहे, पिकवण्यासाठी केळी,
_______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या वेळी.
कपाळावर कुंकू, आणि गळ्यात मोत्याचा हार,
_________ रावांचे नाव घेताना, आनंद होतो फार.
हळदी कुंकूचे, निमंत्रण आले काल,
_______रावांचे नाव घेऊन, कुंकू लावते लाल.
प्राणहीन भासे रासाचा रंग,
________ रावांचं नाव घेते आणि सुरू करते, हळदी कुंकवाचा आरंभ.
कान भरण्यात, बायका आहेत हौशी,
_____ रावांच नाव घेते, हळदी कुंकूंच्या दिवशी.
साड्या घातल्या आहेत, सर्वानी छान,
_____ रावंच नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.
हळदी कुंकूला झाली, महिलांची गर्दी,
________ राव घालतात, पोलिसांची वर्दी.
गळ्यात मंगळसूत्र, हि पतिव्रतेची खून,
_____ रावांचे नाव घेते _____ ची सून.
फुलांनी सजवले, हळदी कुंकवाचे ताट,
_____ रावांमुळे मिळाली, माझ्या आयुष्याला वाट.
हळदी कुंकू आहे, सौभाग्याची शान,
_____ रावांना आहे, सोसायटी मध्ये खूप मान.
सर्व दागिन्यात, श्रेष्ठ काळे मणी,
_______ राव आहेत, माझ्या कुंकवाचे धनी.
वडिलांची माया आणि आईची कुशी,
_____रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंच्या दिवशी.
मावळला सूर्य, चंद्र उगवला आकाशी,
_______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या दिवशी.
हळदी कुंकूला आल्या, साऱ्या महिला नटून,
______ रावांनी आणलेली साडी दिसते, सर्वात उठून.
हळदी कुंकूसाठी, जमल्या साऱ्या बायका,
_______रावांचे नाव घेते, सर्वांनी ऐका.
हिरव्या हिरव्या रानात, चरत होते हरण,
______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकाचे कारण.
नभी उमटले, सप्तरंगाचे इंद्रधनुष्य,
________ रावांचे नाव घेते, मिळो दीर्घायुष्य.
दशरथ राजाने, पुत्रासाठी केला नवस,
______ रावांचे नाव घेते, आज आहे हळदी कुंकवाचा दिवस.
तुमच्या आग्रहाकरिता नाव घेते, आशिर्वाद द्यावा,
____________ रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा.
दिवाळी होती म्हणून, बनवले करंजीचे सारण,
______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंचे कारण.
भारत देश स्वतंत्र झाला, १५ ऑगस्टच्या दिवशी,
______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या दिवशी.
जास्वदांच्या फुलांचा हार, गणपती बाप्पाच्या गळ्यात,
_______ रावांचे नाव घेते, स्त्रियांच्या मेळ्यात.
नीलमणी आकाशात, चंद्राची प्रभा,
_______ रावांच्या नावामुळे, कुंकवाची शोभा.

You may also like

मराठी उखाणे

Marathi Ukhane For Female | स्त्रियांसाठी मराठी उखाणे.

Marathi Ukhane For Female आई बाबांच्या प्रेमापुढे, नाही कोणाची गरज, ________ रावांचे माझ्यावर प्रेम पाहताच, मी त्यांना होकार दिला सहज.
मराठी उखाणे

Best Marathi Ukhane For Bride | नवरीसाठी उखाणे.

Best Marathi Ukhane For Bride पिवळा पितांबर, श्रीकृष्णाच्या अंगावर घातला, _____ रावांच्या जीवनासाठी, स्त्री जन्म घेतला. स्वातंत्र्याच्या होमकुंडात, वीरांनी घेतली